शिक्षण महर्षी,कृषिरत्न


डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

एक दीपस्तंभ _अनिल वि. चोपडे 


विदर्भाच्या मातीचे सुपुत्र म्हणून ज्यांना आदराने उल्लेख केला जातो, ते म्हणजे शिक्षण महर्षी व कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख. दिनांक 27 डिसेंबर 1898 हा दिवस भारताला महत भाग्याचा ठरला या दिवशी बहुजनांचा कैवारी पापळ या गावी शेतकरी कुटुंबात जन्माला आला. तो कैवारी म्हणजेच पंजाबराव देशमुख जो आपल्या स्वकर्तृत्वाने प्रकाशमय होऊन, लोकनेता बनून सर्वांचा लाडका झाला. गीाजयंतीच्या दिवशी या वैदर्भीय कृष्णाने जन्माला येऊन समाजद्रोही कंसाचा वध करुन दिल्लीचे तख्त मिळविले. शेतकर्‍याचा हा मुलगा भारताचा कृषिमंत्री होऊन शेतकरी सुखी व्हावा व शेतकर्‍यांची भावी पिढी सुशिक्षीत व्हावी याकरिता आपला देह चंदनासारखा झिजवू लागला.
डॉ. पंजाबराव देशमुख हे शेतकरी कुटुंबात जन्मलेले असल्यामुळे त्यांनी शेतकर्‍यांची अवस्था पाहिलेली व उपभोगलेली होती. भाऊसाहेबांच्या बालमनावर व सर्व परिस्थितीचे भेसूर चित्र कोरलेले होते. त्यामुळेच बहुजन व कष्टकरी समाजाला या तून बाहेर पडायचे असल्यास त्यांना शिक्षण देऊन सुसंस्कृत करणे आवश्यक आहे असे त्यांचे ठाम मत होते. समाजाला नुसते शिक्षित करुन चालणार नाही तर समाजात जबाबदार नागरिक कसे तयार होतील याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. कृषिशिक्षण, लोकशिक्षण तसेच अशिक्षित व अज्ञानी असूनही ज्यांच्यामध्ये अंगभूत कलागुण आहेत अशा सर्वांना योग्य संधी उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. भाऊसाहेबांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी कसा असतो आणि कसा जगतो याचा त्यांना चांगला अनुभव होता. म्हणूनच त्यांनी शेतकर्‍यांचे जीवन उजळून टाकण्याची प्रतिज्ञा केली. त्यानंतर त्यांनी स्वत:ला समाजकार्यासाठी झोकून दिले. शेतकरी सुखी तरच जग सुखी हा मंत्र त्यांनी नुसता जपलाच नाही तर त्या दिशेने त्यांनी अभिजात कार्य सुरु ठेवले त्यांची बुद्घिमत्ता आणि संयमी स्वभाव यामुळे त्यांना अनेक संधी चालून आल्या. 
सन 1928 मध्ये भाऊसाहेब अमरावती जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष झाले. त्यांचे कार्य आणि लगन पाहून त्यांना सन 1952 मध्ये भारताचे कृषिमंत्री करण्यात आले आणि विदर्भाचा गौरव त्यांनी वाढविला सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरु केले. शिक्षणाची गंगा मूठभर लोकांच्या हाता न राहता ती खेडोपाडी निरक्षरांपर्यंत पोहचविली आणि शिक्षणाचे दालन सर्वांसाठी खुले केले. सन 1932 मध्ये अमरावती नगरीत श्री.शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. खेडोपाड्यात विद्यालये, वसतिगृहे महाविद्यालये स्थापन केली. सन 1946 मध्ये अमरावतीला श्री शिवाजी महाविद्यालय सुरु केले. पुढे विज्ञान, कृषि, ट्रेनिंग कॉलेज, ग्रंथालय, क्रमाक्रमाने सुरु केली, आर्थिक दृष्टीने कमजोर असलेलया शेतकर्‍यांच्या मुलांना स्कॉलरशिप मिळवून दिली. आर्थिक दृष्टीने कमजोर असणार्‍या बहुजन सामाजाच्या मुलांना ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेऊन पोहचविले. आज त्यांच्या लौकिक भारतात झला आहे. भारतातील शेतकरी शेतमजूर भारताचा राजा व्हावा हीच त्यांची मनीषा होती. जगाचा पोशिंदा शेतकरी आज अर्धपोटी, अर्धनग्न असून तो आत्महत्येकडे वळत आहेत. शेतकरी सुखी तर देश सुखी हे शासनाचे धोरण शेतकर्‍यांच्या हिताचे राहिले नाही. ही खर्‍या अर्थाने लोकशाहीची विटंबनाच ठरली आहे. पायाला माती न लागू देता पंचतारांकित हॉटेलात बसून अनेक पुढारी दिल्लीचे आणि प्रांताचे राजकारण चालवितात हे आश्चर्यकारक होय, असे भाऊसाहेब म्हणत असत. 
भाऊसाहेब कृषिमंत्री असताना त्यांनी शेतकर्‍यांच्या हिताचा कर्ज निवारण कायदा पास करुन अमलात आणला. भारत कृषक समाजाची स्थापना करुन त्यांनी पंजाब पासून तर सर्व प्रातांतील शेतकरी सेघटित केले. अनेक अधिवेशने व परिषदा दिल्लीत आणि भारतात भरविल्या. भारत हा जगाच्या मानाने कृषि क्षेत्रात फार मागासलेला देश आहे हे पटवून दिले. शेतकर्‍यांनी त्यांचया कार्यास उचलून धरले. 
भाऊसाहेबांनी अस्पृश्यतेची कीड नष्ट करण्याचा प्रयत्न केला अणि त्यासाठी संघर्ष केला. असंख्य विद्यार्थ्यांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली भाऊसाहेब अनाथाचे नाथ झाले. कृषिमंत्री असताना परदेश दौरा करुन त्यांचे तंत्रज्ञान भारतात आणले. त्यांनी अमेरिका, नार्वे, जपान अशा अनेक देशांचा दौरा केला. भारतीय शेतकरी संघटित झाले आणि तरुण शिक्षित झाले तरच देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे. असा विचार भाऊसाहेबांचया मनात आला आणि त्या दिशेने अनेक अथक परिश्रम करुन आणि संतुलन कायम ठेवून भाऊसाहेबांनी सौजन्याने दर्श घडविले. म्हणूनच भाऊसाहेब खरे द्रष्टे पुरुष सिद्घ झाले. भाऊसाहेबांचे उभे आयुष्य म्हणजे कर्तृत्वाचा भव्य अन दिव्य साक्षात्कार होय. त्याग आणि सेवा हे त्यांचे ब्रीद होते. भाऊसाहेबांनी रंजल्या-गांजल्यांच्या सेवेलाच आपला धर्म मानला. ही सेवावृत्ती त्यांच्या जीवनात अखेरपर्यंत राहिली. लहानशा खेड्यात जन्म घेऊन गोरगरिबांची सेवा करण्यात त्यांनी जन्माची सार्थकता मानली. 
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या अथक प्रयत्नामुळे देशाचा शेतकरी शिकला, तो दुबळा भोळा, व लाचार राहिला नाही. त्यांचे सत्व जागृत करुन त्याला स्वाभिमानाने जगण्याचा आत्मविश्वास देणार्‍या शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार भाऊसाहेबांनी केला. त्यामुळेच पुढो हा शेतकरी आमदार, खासदार होण्याइतपत धीट झाला. इंजिनिअर झाला, डॉक्टर, संशोधक, शास्त्रज्ञ झाला. हे भाऊसाहेबांनी केलेल्या ज्ञान जागृतीच्या चळवळीचे बळ आहे. ही तयांच्या कर्तृत्वाच्या पुण्याईची शिदोरी पुढच्या अनेक पिढ्यांना पुरणार आहे. 
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सामाजिक, राजकीय व शैक्षणिक असे बहुआमी व्यक्तित्व सर्वश्रृत आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक तेजस्वी पैलू म्हणजे त्यांचे प्रकांड पांडित्य हा पैलू मात्र काही मूठभर लोकांनाच ज्ञात होता भाऊसाहेब उच्च शिक्षणासाठी विदेशात गेले. डॉ. भाऊसाहेबांनी वैदिक वाङमयातील धर्माचा उद्‍गम आणि विकास ह्या विषयावर पी.एच.डी. मिळविली होती. त्यांचे मार्गदर्शक होते. प्रा.ए.ए. मॅगडॉनल विश्वविख्यात भाषाशास्त्रज्ञ.भाऊसाहेबांचे वैशिष्ट्ये असे की, त्यांनी बॅरिस्टरची शेवटची परीक्षा व प्रबंधलेखन एकाच वर्षी केले. त्यांच्या या विलक्षण बुद्घीमत्तेचे व मेहनतीचे चिज झाले 25 जानेवारी 1925 रोजी लंडनच्या लिंकन इन मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांचा डी. फील. ही पदवी देऊन सन्मान केला. वैदिक वाङमयातील धर्माचा उद्गम आणि विकास ह्या ग्रंथाच्या निर्मितीसाठी भाऊसाहेबांनी ऋग्वेद, सामवेद, यजर्वेद, अर्थवेद, असे चार वेद तसेच अरण्यके, ब्राह्मण्यके, श्रृतीस्मृती, गीता ह्यांचे सखोल अध्ययन केले. थोर विचारवंतांच्या तत्त्वज्ञानाचा आढावा घेऊन त्यातून त्यांना गवसलेले सत्य त्यांनी आपल्या ग्रंथात प्रतिपादन केले. सत्य व कर्मावर आधारित धर्माची ओळख त्यांनी जगाला करुन दिली. 
ज्याप्रमाणे संतांना माणसात देव दिसला, त्याचप्रमाणे भाऊसाहेबांना शेतकर्‍यांमध्ये देव दिसला. ज्ञानानेच अंधाराचा नाश होतो हे तत्त्व उराशी बाळगून ज्ञानाची गंगा खेडोपाड्यात नेण्याचे महान कार्य डॉ. भाऊसाहेबांनी केले आणि या कर्मयोगामुळेच ते अमर झाले. अशा या लहान नेत्याना मृत्यू दि. 10 एप्रिल 1965 रोजी दिल्ली येथील विलिंग्डन हॉस्पिटल मध्ये झाला. अशा ज्ञानयोगी, कर्मयोगी महामानवास विनम्र अभिवादन!
_________________________________________________
- अनिल वि. चोपडे विश्रामगृहाजवळ, अंजनगाव सुर्जी, 
(शा.शिक्षक) नृसिंह विद्यालय, अचलपूर, जि अमरावती मो.नं 9850923376

(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार)

No comments:

आदरांजली :

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्व जगाला परिचित आहेत.‘बहुजन हिताय’हा त्यांच्या जीवन-कार्याचा मूलमंत्र होता.‘वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास’ ह्या ग्रंथातील भाऊसाहेबांचे संशोधन भारतीय दैवतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.भाऊसाहेबांच्या चरणी ही नम्र आदरांजली...




लोकमत : अकोला : दि.२६ एप्रिल २००९

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :
"Art is long and life is short,Remember this and drive your cart." - Dr.Punjabrao Deshmukh

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा