यांची वाट
जात असते ‘मरणाच्या मैदानामधून’
अमरतेच्या आकाशगंगेकडे
असतो निर्धार यांचा
‘भवानीच्या’ धारेइतका आरपार ‘छत्रपतीच्या’
यांचे प्रत्येक पाऊल ठाम पडत असते
गीतार्थ आकळलेल्या पार्थाच्या पौरुषाने
कर्तव्याच्या कुरुक्षेत्रावर
यांच्या एका डोळ्यात आईन्स्टीन
आणि दुसऱ्यात तुकाराम असतो !
म्हणूनच कृष्ण काय किंवा सुदामा काय
साम्य अनुभवतात
किंबहुना संपुर्ण आयुष्यच यांचे
एक वेदोक्त व्रत असते
साधनेच्या शुचिर्भूत पथावरून
अनंताकडे संथ सरकणाऱ्या
‘तापहीन मार्तडा सारखे’
- उ.रा.गिरी
No comments:
Post a Comment