शिक्षण महर्षी,कृषिरत्न


डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

आस्तिक ऋषि


- किनारा न ज्याला अशा सागराची
कथावी कशी सांग संवेदना
उरीं रे उराच्या किती सांगतांना
तरीही असंख्यात त्या वेदना!

नव्हे अंत ज्याला असे अंतराल
कुठे सांग विश्वात उपमान त्या
कशी वैखरी ही अभिधा कशी ती
कुठूनी कथा युक्त सांगेल ह्या!

होतीच ती वेदना प्राचिन्
पुन्हा आस्तिकाचिच घडली कथा
कथा ही ‘सनातन’ घडावी ‘वथे’ चि
गड्या, भारताची जुनी ही व्यथा !

अशा या व्यथेची पुन्हा हो न वृत्ति
इतिहास साक्षी ! उभा ठाकला
अरे, आवृत्ति ही कधीहि न होईल् 
अशी द्यावायाला हमि जागला !

‘बहूता जनांच्या’ म्हणूनि सरीता
इथे संगमि साधण्या पुर्णता
खरे सांगतो त्या कृत्यकृत्य झाल्या
निसर्गातहि ना अशी पुर्तता !

तये घेतली मृत्तिका गा करात
जिला कोणताहि न आकार होता
निराकारीता ही परब्रह्म साक्ष
अम्हि साक्ष ! - आम्हास आकार येता

असा हात पाठीवरी ठेवलेला
स्मरे, स्वर्गीचे अमृत प्राशिलो
तयातुन उमेदि अशा निर्मिल्या कि
पुन्हा वातले,‘शीवनेरी’स आलो !

सलीलातली लाट त्या सागराची
अशी उंच की -‘देवतात्म्यापरि’
उभे न्हात गेलो, - शुचित्वापदाला
अम्हि पोचलो ‘मुक्त’ आत्म्यापरि !

शिडें शुभ्र-नौका-अशी वेगळीच
किनारा बघाया - हवे ते दिले
अरे, ‘दृष्टि कोलंबसि’ जे न देखे
असे विश्व तेथे अम्हि पाहिले !

तसा एकट्याचा लढा पाहिला मी
‘शिखंडी’ हि ते पुर्ण अभ्यासिले
अगा, मी ‘सुपुत्रा’ विराटा घरीच्या
महाभारती जे न - ते पाहिले !

असा हा ऋषि जो वरी शांत होता
जयाच्या वडाग्नि असे अंतरी
परि अग्निचे काष्ठ भक्षून झाला
तपस्वीच जो दिक् सीमांचा अरि !

अशा दिक् सीमांचा अरिला प्रणामी
ऋणाचे ऋषीच्या इथे काज आहे
उद्या ? “ काल आहे अनंतावधीचा”
महाराष्ट्र हा येथ सत्यार्थ राहे !

बघाना तया ‘छत्रपती’ लाहि आज
अनंतावधीने मिळे न्याय न्याय
तसा “सागरा” शिवविस्तारकर्त्या
अजिं वा उद्या न्यायचि न्याय न्याय !

-भाऊ भालेरावNo comments:

आदरांजली :

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्व जगाला परिचित आहेत.‘बहुजन हिताय’हा त्यांच्या जीवन-कार्याचा मूलमंत्र होता.‘वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास’ ह्या ग्रंथातील भाऊसाहेबांचे संशोधन भारतीय दैवतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.भाऊसाहेबांच्या चरणी ही नम्र आदरांजली...
लोकमत : अकोला : दि.२६ एप्रिल २००९

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :
"Art is long and life is short,Remember this and drive your cart." - Dr.Punjabrao Deshmukh

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा