विदर्भाची माती


धूळाक्षरे पाटीवरी
जेव्हा धुळींतुनी आली
तेव्हा विद्येची महती
मातीलाही समजली !

मातींतुनी येती शब्द
शारदेच्या कृपाबलें
बोलू लागली मातीही
गूज कुणा उमगले ?

विदर्भाच्या मातीमाजीं
अवतरे योगी-ज्ञानी
ज्ञानवल्लीची लावणी
केली‘पंजाबरावांनी’ !

इथें उन्नतिच्या शाळा-
ठायीं ठायीं विद्यालये
उभविली योगियाने
तैशी महाविद्यालये.

इथें अमरपुरीला
‘ज्ञानामृताचिया वेली’
पुर्णामाईच्या पाण्याची
पुर्णा ज्ञानगंगा केली !

-सोपानदेव चोधरी

No comments:

Post a Comment