अभयदान


- जगविण्यात आली येथे-माणसे-हजारो कैदी
सत्तांच्या शूळांनी, धर्माच्या हातोड्याने
चेचून काढलेल्या मेंदुंची
पशुवत त्यांची वस्ती.

- समर्थपणे जर कोणी ताठ उभा झाला
गुरूदक्षिणा म्हणूनी आज्ञा
आंगठे छाटुनी नेले
येथच्या एकलव्यांचे.

कर्ण कुणी एखादा पालटून रूप अपुले
उपासनेत दिसला गुंग पण रक्त बोलके त्यांचे
हेरून काढिती धुर्त
हा शाप असा कायमचा.

-तुक्या पुरुनी उरला
हा प्रहार पहिला झाला
मग-चोखा, सेना, गोरा, सावता, निळोबा आला
मग-युगप्रवर्तक ज्योति
यासच म्हणती क्रांति.

-वाहु लागता वारे
वऱ्हाडही जागा झाला शेतक-यांचा ‘भाऊ’ -  अभय देउनी गेला
‘शूद्रांना शिक्षण बंदी?
आंगठे छाटतो कोण?
कर्णांना शापिल कोण?
माय कुणाची व्याली?’

-गो.रा.वैराळे

No comments:

Post a Comment