शिक्षण महर्षी,कृषिरत्न


डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

मायेचा हात___प्रा.बी.के.राणे

सन 1962 चा काळ डॉ.भाऊसाहेब पंजाबराव देश मुख लोकसभेकरिता निवडणूक लढवित होते. एका शेतक-याचे पोटी जन्माला आलेला. इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर झालेला, गरिबीतून शिकलेला, म्हणून मी त्यांना ओळखत होतो. विशेष म्हणजे एवढे असूनही बहुजन समाजासाठी झटणारा. त्याग तसेच तपस्येच्या महान साधनेव्दारा लोकोव्दारासाठी जीवन समर्पण करुन स्वत:ला समाजकार्यात पूर्णपणे झोकून दिलेला एक कर्तृत्वान पुरुष अशी भाऊसाहेबांविषयी माणी त्यावेळी धारणा होती, साहजिकच त्यांचेकडे माझा ओढा होता. मी त्यांनी सुरु केलेल्या श्री शिवाजी महाविद्यालयातून नुकताच बी.ए.पास होऊन समाजाभिमुख भाऊसाहेबांसारखेच काही कार्य करण्याचे ठरविले होते. 
निवडणुकीसंबंधाने भाऊसाहेबांचा कार्यक्रम अमरावती येथून 8,10 कि.मी. असलेला वडगाव माहोरे ह्या गावी होता. भाऊसाहेबांची सभा होती. मला ही बातमी समजल्यामुळे मी तेथे जाण्याचे ठरविले. अजून तेथे जाण्याचे दुसरेही एक कारण होते, ते म्ळणजे माझे मामा शंकरराव माहोरेंचे ते गाव. माझी परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे मी तसाच पायी निघाला होतो. रहाटगाव फाट्यावरुन 3,4 कि.मी. अंतर होते. तेवढ्यात भाऊसाहेबांची गाडी मागून येतांना दिसली. मला पायी जातांना पाहून थेडी पुढे नेऊन भाऊसाहेबांनी माझ्या लगतच गाडी उभी केली. एवढ्या रात्री 8,9 वाजता तू कुठे जातो? असे विचारले. माझी केविलवाणी स्थिती पाहून तू गाडीत बैस असे म्हणून पाठीवरुन मायेचा हात फिरविला. मला अतिशय आनंद झाला. तो एक प्रकारचा अशीर्वादच होता. श्री मामासाहेब लोंढे हेही भाऊसाहेबांसोबत होतेच. रस्त्याने गप्पा-गोष्टी झाल्या मी काय करतो. पुढे काय करणार इत्यादी विचारणा झाली. आपलयाच श्री शिवाजी महाविद्यालयातून मी बी.ए.पास झालो. बी.टी. केल्यावर नोकरी करावी. मी उतरलो. त्यावर भाऊसाहेब म्हणाले लवकर बी.टी. होताच1963 मध्ये खरोखरच श्री शिवाजी शिक्षण संस्थेत मला नोकरी मिळाली.
केवळ दहा मिनिटांचा सहवास. परंतु मी जणूकाही भारावल्यासारखा झालो. वडगाव माहोरेला पोहोचलो. माझ्या मामाचेच गाव. सगळे मोठ्या आश्चर्याने बघायला लागले. हा भाऊसाहेबांसोब कसा?गावकरी मंडळींनी कार्यक्रमाचे संचालन माझ्याकडे दिले. भाऊसाहेबांच्या भाषणात सुद्घा माझ्याबद्दल उल्लेख झालाच. गावांतील सर्व मला मान देऊ लागले. सर्वांनी सहकार्य केले. पुन्हा परत येतांना भाऊसाहेबांनीच चलतो का?विचारले. मी मात्र मुक्कामच केला. 
सन 1964 मध्ये भाऊसाहेब मोर्शी येथील श्री शिवाजी विद्यालयाला भेट देण्यासाठी आले. कामाची भाऊगर्दी असल्यामुळे सर्कीटहाऊसवर आम्हा सर्वांना बोलाविले. मी श्री शिवाजी विद्यालयामध्येच शिक्षक होतो परिचय करुन घेत असतांना माझेकडे भाऊसाहेबांचे लक्ष गेले. मी परिचय देणार तेवढ्यातच वडगावच्या कार्यक्रमाचे संचालन करणारे तुम्हीच ना?इतकी जवळिक व ओळख कशी ह्यावरच मी चिंतन करीत राहिलो. श्री. अण्णासाहेब कानफाडे आमचे मुख्याध्यापक हा इंग्रजी शिकवितो असं. सांगताच मग चांगलाच निकाल लागेल. भाऊसाहेब लगेच आशिर्वादपर अभिप्राय देऊन मोकळे झाले. मी ह्याला आशीर्वाद ह्यासाठी म्हणतो की, त्यावर्षी हायर मॅट्रीक वर्ग 11 इंग्रजी विषयाचा निकाल 94%लागला. तरीही शंभर टक्के का नाही?असे अण्णासाहेब कानफाडेचेंही माझेवर प्रेम होतेच. माझ्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांचे मार्गदर्शन व सहानुभूती ह्यामुळेच मी चांगले अध्ययन करु शकलो. 
भाऊसाहेबांच्या अल्पशा सहवासातील हा सुखद प्रसंग व आठवण सांगताना आजही डोळे पाणवतात. म्हणावेसे वाटते-

दिव्यत्वाची जेथ प्रचिती 
तेथे कर माझे जुळती

आदरणीय, भाऊसाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात माझी सेवानिवृत्ती व तिही एकसष्टी वर्षात हा एक मोठाच योगायोग म्हणावा लागेल. अशा त्या महात्म्याला माझे कोटी कोटी प्रणाम. 
______________________________________
प्रा. बी.के.राणे, राठी नगर, अमरावती.

(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार)

No comments:

आदरांजली :

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्व जगाला परिचित आहेत.‘बहुजन हिताय’हा त्यांच्या जीवन-कार्याचा मूलमंत्र होता.‘वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास’ ह्या ग्रंथातील भाऊसाहेबांचे संशोधन भारतीय दैवतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.भाऊसाहेबांच्या चरणी ही नम्र आदरांजली...
लोकमत : अकोला : दि.२६ एप्रिल २००९

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :
"Art is long and life is short,Remember this and drive your cart." - Dr.Punjabrao Deshmukh

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा