शिक्षण महर्षी,कृषिरत्न


डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

कृषिरत्नाकडून भारतरत्नाकडे !__प्राचार्य सुधाकार मोहोड

भारतातील अग्रगण्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती 2008 मध्ये आपला अमृत महोत्सव साजरा करत आहे. 1931-32 साली अमरावती येथे श्री शिवसंस्थेची स्थापना झाली. संस्थेचे स्थापना वर्ष म्हणजे क्रांतिज्योति सावित्रीबाई यांची जन्मशताब्दीची क्रांतिप्रभा जोतीराव, सावित्रीबाई म्हणजे भारतीय शिक्षणक्रांतीचे क्रांतिदूत. आज शिवसंस्था आपल्या अमृत महोत्सवाकडून नजीकच्या शताब्दीकडे वाटचाल करण्याच्या भव्य योजना राबवण्याची तयारी करत क्रांतिबळ संघटित करत आहे. संस्था संस्थान न बनता आपले चिरंजीवित्व प्राप्त करणार ! 
शिवसंस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षि डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी समाजपरिवर्तन, व्यवस्थापरिवर्तन आणि मूल्यपरिवर्तन करण्यासाठी शिवसंस्था स्थापन केली. कृषिरत्न डॉ. भाऊसाहेब आपल्या जीवनकार्यातून भारतरत्नाकडे जाणार ! आजच्या 107 कोटींच्या भारतात किमान शंभर भारतरत्न हवेत. विविध क्षेत्रांतून मानवता क्रांती करणारे ग्रामीण धुरंधर भारतरत्न पदवी द्बारे का सन्मानित करू नयेत? 1901 पासून नोबेल पुरस्कार द्बारे जसे जागतिक स्तरावरील प्रज्ञावंत गौरवान्वित करण्यात आले तसे भारतातही आसेतु हिमाचल शिक्षण, सहकार, कायदा, कृषी आदी क्षेत्रांत अद्बितीय कार्यकर्ते भारतरत्न द्बारे समाजापुढे का आणू नयेत? खंडप्राय भारतात स्वातंत्र्यानंतर कुठल्याच क्षेत्रात विषमता दिसू नये हे 21 वे शतक.

युगप्रवाह । युगप्रज्ञा । :

युगपुरुषांना आपल्या आधीचे युगपुरुष जाणून घेऊनच आपल्या नंतरचे युगपुरुष आणि वारसदार यांच्या विचारांची, संस्था-संघटनांची चिरंजीवी रचना निर्माण करावी लागते. हाच वैश्विक संस्कृति-सभ्यतांच्या उदयास्तांचा निष्कर्ष आणि सारांश आहे. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख आदींनी युगतत्व ओळखूनच आपले वारसदार लढाऊ आणि संघटित बनवलेत. त्यांच्या अष्टपैलू, कार्यातून निद्रिस्त समाजाचे डोळे उघडलेत. ज्ञानविज्ञान नेत्रांद्बारे समाजाचे बहिरंग आणि अंतरंग ढवळून काढले. क्रांतिकारी नवयुगाची नांदी त्यांना घातली. एकोणविसाव्या शतकातील भारतीय आणि जागतिक समाज यांत खूप अंतर आहे. माणसांना आणि व्यवस्थेला नवपैलू पडले. मानसिकता बदलली.
कृषिरत्न डॉ. पंजाबरावांनी सुधारक (Reformer) क्रांतिकारक (Revolution) आणि बंडखोर (Rebel) अशा तीन भूमिकांतून आपले जीवनकार्य उभारले. शिक्षणमहर्षि डॉ. भाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व, कार्यकर्तृत्व आणि क्रांति तत्वज्ञान यांतून साकारले. क्रांतीनंतर प्रतिक्रांति असे युगचक्र सतत सुरू राहते ! म्हणून क्रांती कधी संपत नाही. नवनव्या वास्तवाला समजून घेत नवनव्या मार्गांनी युगक्रांतिचक्र पुढे पुढे न्यावे लागते. क्रांतीला विश्रांती नसते ! ज्ञानविज्ञानाला झोप नसते ! थांबला तो संपला ! जागला तो तरला ! शोषक संघटनांना आणि साम्राज्यांना अमरत्व नसते ! इंग्लंडच्या साम्राज्यावर सूर्य मावळलाच ! गुलामगिरी संपली आणि स्वातंत्र्याचा सूर्योदय घडला. उदवास्तांची कारणे असतातच. आज भारताची 107 कोटी लोकसंख्या आणि जगाची 650 कोटी जनसंख्या विश्वक्रांतीची व विश्वशांतीची भुकेली आहे. भाकरीला ज्ञानाची आणि ज्ञानाला भाकरीची भूक असतेच ! मानवी मने, मेंदू आणि मनगटे प्रज्ञा, प्रतिभा, पराक्रमाद्बारे समाजभूक मिटवण्यासाठीच क्रांतिध्वजा हाती येतात. मानवी समाज एक विचित्र दिग्विजयी रसायन आहे ! उत्पत्ती, स्थिती आणि लय, हा युगनियम आहे ! सृजन आणि संहार, विकास आणि विनाश, जीवन आणि मरण यांना सामोरे जातच जननेतृत्वाला आपले जीवनकार्य चिरंजीवी करण्यासाठी मार्ग शोधावे लागतात. औद्योगिक क्रांती, राज्यक्रांती, कम्युनिस्ट क्रांती, दोन विश्वयुद्घे अभ्यासूनच विश्वस्वातंत्र्याच्या चळवळी आणि आंदोलने साकारली.

संस्था आणि संस्थापक : 

एकोणिसाव्या शतकात जागतिक व्यवस्था-परिवर्तनाच्या तीन महान घटना घडल्या. अ. साम्यवादाचा 1848 जाहीरनामा (कम्युनिस्ट मॅनिफेस्टो) कार्ल मार्क्स, ब. पुणे येथील दलित मुलींची शाळा (1848) महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा शैक्षणिक जाहीरनामा आणि मॉस्को येथील आपल्या फार्म मध्ये लिओ टॉलस्टॉय युद्घ आणि शांती (वॉर ऍन्ड पीस) ग्रंथाचा (कादंबरी) महान लेखन याने उघडलेले फार्म स्कूल (1849) जगातील शेतकर्‍यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उघडलेली पहिली शाळा : शेतकरी शिक्षणाचा जाहीरनामा । या तीन जाहीरनाम्यांनी आधुनिक युगातील भांडवलशाही आणि ब्राम्हणशाही यांच्या गुलामगिरीतून जगाला सोडवणारी जनआंदोलने आणि चळवळी संपूर्ण जगामध्ये सुरू झाल्या. जोपर्यंत शेतकर्‍यांच्या मुलांना, दलित मुलींना आणि किसान-कामगारांना शिकवले जात नाही तोपर्यंत त्यांनी चौफेर गुलामगिरी, असह्य दारिद्र्य आणि अमानुष सनातनी मूल्यवस्था ढासळून नवे युग निर्माण होणार नाही, याची जाणीव जगाला झाली. साम्यवादाचे जगाला किंटरगार्टन शिक्षणप्रणाली आणि आर्थिक सामाजिक नियोजन या दोन देणग्या दिल्या. उपरोक्त तीनही जाहीरनाम्यांचा निष्कर्ष आणि सारांश म्हणजे शेतकरी, कामगार, दलित, स्त्रीवर्ग शिक्षणाविना स्वातंत्र्य, समृद्घी, समता उपभोगु शकत नाहीत. मार्क्स, फुले, टॉलस्टॉय यांनी जागतिक स्तरावरील दलित वर्गाला ओळखून शतपैलू स्वातंत्र्याचा क्रांतिमार्ग जगापुढे ठेवला. या क्रांतिसंस्था, हे क्रांति-उत्क्रांतीचे संस्थापक विचार-आचार-प्रचार घेऊन विसाव्या शतकात आले.

विसावे शतक-दोन महायुद्घे:

विसाव्या शतकातील दोन विश्वमहायुद्घांनी जगाला क्रांतीची समरभूमी बनवून क्रांतिदीक्षा दिली. विसावे शतक संपूर्ण जगासाठी स्वातंत्र्याचे शतक बनले. ब्रिटिश साम्राज्यासह सर्व लहानमोठी साम्राज्ये जगातील नकाशातून नष्ट झाली. स्वतंत्र राष्ट्रे उदयाला आली. डॉ. पंजाबरावांच्या तारुण्यात भारतात आणि इंग्लंडमध्ये नवनवी मन्वंतरे साकारायला लागली. दास्य, दारिद्र्य, अस्पृश्यता, शोषण, काळे-गोरे, स्त्री-पुरूष सर्वांनाच स्वातंत्र्य, समृद्घी, समता हवी होती. सर्वांनीच शस्त्रे आणि शास्त्रे हाती घेतली ! बंदुका, बॉम्ब, ग्रंथ, लेखण्या, खडू-फळा, कला आणि शास्त्रे समाजाची शस्त्र बनली. विसावे शतक नरसंहारातून नवसृजनाकडे वळले. शिक्षण महर्षी डॉ. पंजाबरावांनी लंडनमध्ये लोकशाहीचा आणि लोकसमृद्घीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. ज्ञानविज्ञान घेऊन लोकशिक्षणासाठी भारतीय रणांगणात उतरला ! संस्कृत पंडित क्रांतिपंडित बनला. संस्कृत पंडितांची ही ज्ञानविज्ञान-क्रांती सनातनी महापंडित उघड्या डोळ्यांनी पाहत होते ! पंजाबरावांचे सूर्यतेज परंपरावाद्यांच्या डोळ्यात मावत नव्हते. प्रतिक्रांतीचे महापंडित भारतात ठायी ठायी विरोधाला उभे झाले ! स्वजनांच्या लढाईसाठीच डॉ. पंजाबराव प्रतिज्ञाबद्घ बनले. पेशवाईचे अवशेष थरथरायला लागले ! वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास (The Origin and Development of Religion in Vedic Literature) गाईडच्या आदेशाने अपूर्ण ग्रंथालाच D. Phil पदवी प्रदान करण्यात आली. जगातील विविध धर्मांमधील व्याख्यांचा उहापोह करीत ऑक्सफोर्ड-पंडित डॉ. पंजाबरावांनी आपली धर्माची व्याख्या पा.क्र. 18 वर मांडली.


A Religion is a social institution, having a set of principles, doctrines, beliefs and practices and certain more or less imperative rules of conduct which are in accordance with those principles, doctrines and beliefs and which aims at furtherin human happiness. समाजकल्याण म्हणजेच सुखमय, प्रगतीशील धर्मजीवन.

पंजाबराव भारतात परतले : 

1925 साली डॉ. पंजाबराव मायदेशी परतले. देशाचे दुश्मन खटला विनामूल्य चालवून दिनकरराव जवळकरांवा पूर्ण यश मिळवून दिले. 1926 साली श्रद्घानंद वसतिगृहातील मुलांनी भरीव योगदान दिले. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू श्री. वा. मो. दादासाहेब काळमेघ आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष (कै.) हे याच श्रद्घानंद वसतिगृहातून शिकले. विविध क्षेत्रातील मान्यवरांची निर्मिती येथेच झाली. डॉ. पंजाबराव was moving fast व्यायाम शिक्षण संस्थेची स्थापना केली. प्रत्येक शाळेत व महाविद्यालयात व्यायाम शिक्षकाची नेमणूक करण्याबाबत पंजाबरावांनीच खेळक्रांती घडवली. खेळांना (Sports) शिक्षणाचा अविभाज्य आणि अटळ भाग भाऊंनी मानला. मराठा शिक्षण संस्थेची स्थापना करून या मार्शल रेस ला भाऊसाहेबांनी (सोशल रेस) विशाल रणभूमीवर उतरवले. अस्पृश्यता निवारणात आणि चातुवर्ण्य विरोधात हा सेनानी अग्रेसर बनला. अमरावतीचे अंबादेवी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले. सब के लिए खुला है मंदीर यह हमारा ही राष्ट्रसंत ग्रामगीतकार तुकडोजी महाराजांची हाक त्यांनी पूर्वीच ऐकली ! ग्रामनाथासाठीच वर्‍हाड शेतकरी संघाची स्थापना केली. 26 नोव्हेंबर 1927 ला सुवर्ण समाजातील कु. विमल वैद्य, मुंबई या सुविद्य युवतीशी प्रार्थना समाजाच्या पद्घतीने आंतरजातीय विवाह केला. Dearest Vimal म्हणून आपल्या जीवनात त्यांनी विमलाबाईशी पत्रव्यवहार केला! विमलाबाई विवाहानंतर बी. ए. एल. एल. बी. झाल्यात. बॅरिस्टर होऊन इंग्लंडहून परतल्यावर राणीछाप रुपयांनी भरलेली पोती घेऊन अनेक धनिकांनी आपल्या कुटुंबातील मुलींशी भाऊसाहेबांनी विवाह करावा म्हणून विनवण्या केल्या. तत्पूर्वी शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्यासाठी त्यांना कुणी कपर्दिकही दिली नाही ! डॉ. भाऊसाहेबांनी धनाढ्यांना नकार दिला ! स्वत:वर कर्जाचा डोंगर असताना त्यांनी विमलबाईंना दिलेले अभिवचन पूर्ण केले. भाऊसाहेबांच्या मृत्यूनंतर विमलाबाई संसद सदस्य बनल्या. चाळीस हजार रुपयांचे कर्ज असलेल्या बॅरिस्टरांची मी धर्मपत्नी बनले ! जगाला हेही कळू द्या - माझे पती जीवनावर जनसेवेतूनच सर्वोत्तम ईश्वर सेवा करीत होते. जगाला सत्य कळू द्या. आम्ही सुखी होतो. डॉ. पंजाबरावांशिवाय त्या काळात वर्‍हाडात काय होते ! I have no regrets, Barister Balister! -विमलबाई

तीन संस्था ! तीन संस्थापक !

सातार्‍याची रयत शिक्षण संस्था, अमरावतीची श्री शिवाजी शिक्षण संस्था (1931-32) आणि औरंगाबादची पीपल्स एज्युकेशन सोसायटी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात राजकीय स्वातंत्र्यासोबतच भारताचे शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक स्वराज्यासाठी राष्ट्रनेत्यांनी निर्माण केल्या. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तीनही संस्थापक आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ होते. राजर्षि शाहू महाराजांनी तीनही संस्थापकांना स्फूती देऊन पुढे आणले. कर्मवीर भाऊराव, राजर्षि शाहू महाराजांच्या वसतिगृहातच कोल्हापूरला तयार झाले. डॉ. आंबेडकरांना शाहू महाराजांनी उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करून विदेशात पाठवले. आणि खामगावच्या अ. भा. मराठा शिक्षण परिषदेच्या (1920) छत्रपती शाहूंच्या विचारांनी तरुण पंजाबराव भारून गेले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वोत्कृष्ट क्रांतिग्रंथ म्हणजे राजर्षि शाहू महाराजांचे जीवनचरित्र ! अभ्यासकांच्या मते जगात 2500 वर्षात तीनच राजर्षि Philosopher Kings दिसतात. जगाचे व बुद्घ धर्माचे राजर्षि गौतम बुद्घ, भारताचे मानवतानिष्ठ राजर्षि शाहू महाराज आणि तुर्कस्थानचे राजर्षि केमाल पाशा.
डॉ. भाऊसाहेबांनी विसाव्या शतकात अवतीर्ण झालेल्या तीनही शिक्षणसंस्थांचे कार्य पाहिले. आपल्या शिक्षणसंस्थेचा शंभर वर्षांचा आराखडा द्रष्टेपणाने त्यांनी आखला आणि अतिशय वेगवान विकासप्रक्रिया राबवली. आपल्या जीवनानंतर समाजाने श्री शिवाजी शिक्षण संस्थेला एकविसाव्या शतकात नेऊन श्री शिवसंस्थेचा शताब्दी महोत्सव गाजवावा ! उपरोक्त तीनही संस्थांनी महाराष्ट्रात आणि भारतात शेकडो शिक्षणसंस्था निर्माण केल्या. इडा जावो (ब्राह्मणीझमजावो), पीडा जावो (भांडवलीशाही-सावकारशाहीला शोषणमुक्त दीक्षा मिळो) आणि भारतात बळीराजाचे राज्य येवो. अशी भावीकालातील लोकशाही भारताची लोकभावना तीनही शिक्षणसंस्थांनी आणि संस्थापकांनी सन्मानित केली. तुकारामाची इंद्रायणीत बुडवलेली अभंगगाथा या तीन क्रांतिकारी संस्थांनी वर काढून ग्रामिणांच्या-ग्रामनाथाच्या मन-मेंदू-मस्तकात पेरली. आं. रा. शिक्षणमहर्षि डॉ. भाऊसाहेबांच्या जन्मशताब्दीनंतर येणार श्री शिवसंस्थेची शताब्दी.

राष्ट्रपिता ! राष्ट्रसंत ! भारतीय सॉक्रेटिस !

जिजामाता आणि शिवबा जगतगुरु तुकारामाच्या कीर्तनाला जात ! तसेच राष्ट्रनिर्माता डॉ. पंजाबराव ग्रामगीता करार राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या मोझरी आश्रमात जाऊन त्यांचेशी चर्चा करीत. श्री गाडगेबाबांच्या कीर्तनातही भाऊसाहेब तल्लीनतेने या भारतीय सॉक्रेटिसचे मानवतेचे तत्वज्ञान ऐकत ! राष्ट्रसंतांनी ग्रामगीता ग्रामनाथाला अर्पण केली. डॉ. पंजाबरावांनी कृषक क्रांती ग्रामनाथाला समर्पित केली. कम्युनिस्ट मॉक ऑफ इंडिया, फुले विद्यापीठाचा कुलगुरू श्री गाडगेबाबा महाराष्ट्रातील तीनही शिक्षणसंस्थांना भेट देत, तीनही संस्थापकांशी चर्चा करत आणि वसतिगृहांना ताटे, वाट्या कपडे पोचत. विद्यामंदिरांनाच गाडगेबाबा वंदन करत ! त्यांचे शेवटचे कीर्तन (मुंबई) अमृतवाणी म्हणून पुस्तक रुपाने प्रसिद्घ आहे. हा सॉक्रेटिस भारतीय समाजाला ज्ञानविज्ञान, मानवता समजून सांगता होता ! साधुरूपाने धर्मक्रांती, शिक्षणक्रांती, अर्थक्रांती, सांस्कृतिक क्रांती करणारे गांधी, गाडगेबाबा, तुकडोजी, पंजाबराव समकालीन क्रांतिकारक होते. यांच्या आश्रमांना डॉ. पंजाबराव सवड काढून भेट देत. भारतात त्यांनी साधुक्रांतीही घडवली !
राष्ट्रनिर्मात्यांचे मूल्यमापन !
शेतकर्‍यांची सेवा करणे सोपे आहे. त्यासाठी सोपे कायदे, साधे शिष्टाचार व सरळ माणसे हवी आहेत. हे तीनही गुण अंगीकारलेला डॉ. पंजाबराव देशमुख हा कदाचित भारतात या युगातला एकमेव असावा, ज्याने पद, प्रतिष्ठा व पैसा यांना तुच्छ लेखून आपला जीवनयज्ञ चेतवला.
-राष्ट्रपिता महात्मा गांधी

बॅ. पंजाबराव देशमुखादी टीकाकार घटना समितीत नसते तर घटना केवळ मुक्या-बहिर्‍यांचीच ठरली असती. ती केवळ कळसूत्री देखावा ठरला असता.’ -डॉ. आंबेडकर (घटना समितीतील समारोपीय भाषण)
It may be your interest to be our massters, But how it can be ours to be your slaves?
Thuisides
समाजशास्त्र, मानवशास्त्र राबवत डॉ. पंजाबराव समस्या सोडवित होते !

श्री शिवाजी लोकविद्यापीठ: 

‘अत्यंत उच्च श्रेणीच्या विद्बानांची मालिका आपल्या देशात नेहमीच तयार होत आली आहे. पण त्यामुळेच कोट्यावधी देशवासीयांची शैक्षणिक किंवा बौद्घिक पातळी मात्र उंचावली नाही... इतर विद्यापीठांना महामानव निर्माण करण्याकरता सर्व शक्ती व पैसा वेचू द्या. माझे विद्यापीठ मात्र अज्ञान, दारिद्र्य कुचंबण व घृणास्पद अवस्था यांच्या काळ्याकुट्ट अंधकारात चाचपडत पडलेल्या कोट्यावधी स्त्रीपुरुषांमधून समाजसेवक व देशभक्त निर्माण करण्याकरता झटत राहील.’ (लोकविद्यापीठासंबंधीचा प्रबंध, डॉ. पंजाबराव)
शतपैलू शिक्षणक्रांती-उत्क्रांतीसाठी भारतातील श्री शिवाजी लोकविद्यापीठ-भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ-साकार झाले. 30 डिसेंबर, 1950 रोजी भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी श्री शिवाजी लोकविद्यापीठाचे उद्घाटन केले. सर्वांना शिक्षण, सर्वांना संधी ही लोकक्रांती, हे ध्येय होते. डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे पहिल्यांदा अमरावतील या निमित्ताने आगमन झाले. घ्घ्या श्री शिवाजी विद्यापीठाचे कार्य एखाद्या अक्षय वटासारखे सतत वाढते राहणार आहे. स्वतंत्र भारताला अशाच प्रकारच्या संस्थांची नितातंत आवश्यकता आहे. उद्घाटनाशी माझा संबंध येऊ शकला याबद्दल मला फार आनंद वाटला. मी ही संस्था व तिच्या सर्व शाखा यांना पूर्ण सुयश चिंतितो.’ राष्ट्रपती भवनाला शेतकरी भवन बनवणारे डॉ. राजेंद्रप्रसाद आणि कृषिप्रधान भारताला कृषकक्रांतीची शिक्षा-दीक्षा देणारे कृषिरत्न डॉ. भाऊसाहेब दोघेही लोकशिक्षणाचे आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ होते. दोघांचे एकत्र येणे यात लोकस्वातंत्र्याची तळमळ होती. यानंतर 25 वर्षांनी स्वतंत्र भारतात मुक्त विद्यापीठाची चळवळ सुरु झाली. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ केंद्रीय स्तरावर आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मुंबई महाराष्ट्र स्तरावर निर्माण होऊन संपूर्ण भारतात मुक्त विद्यापीठे साकारली. शिक्षणमहर्षि डॉ. भाऊसाहेबांनी विसाव्या शतकातून लोकशिक्षणाला द्रष्टेपणातून एकविसाव्या शतकात पोचवले. सरकारच्या आधी समाजाला अज्ञानातून मुक्त केले.’ आपल्या परंपरागत, परंपराप्रिय व कालविंगत शिक्षण पद्घतीमुळेच आपल्यात मतभेद व विसंवाद निर्माण झाला आहे. निर्भय व आशावादी स्त्रीपुरुष, लोककला, अत्युच्च ध्येये, नीतिमत्ता असलेले लोक आपणास हवे आहेत. निरक्षरता व अज्ञान अंधश्रद्घा व भेकडपणा, अनीतिमत्ता व चारित्र्यहीनता यांतून मुक्त व्हायला हवे. जनसाधारणास सर्व सोयी श्री शिवाजी लोकविद्यापीठाद्बारा उपलब्ध करून देण्याची आमची इच्छा आहे.’ - शिक्षणमहर्षि डॉ. पंजाबराव देशमुख जिथे तिथे अविद्या तिथे तिथे उभा हा संघर्षाला । हिंदवी शैक्षणिक स्वराज्य आणले ।

सहकारी आरे डेअरी मुंबई

भारतातील सर्वात मोठी आणि सर्वोत्तम आरे डेअरी मुंबईच्या निसर्गरम्य क्षेत्रात सहकारी तत्वावर डॉ. भाऊसाहेबांनी सुरु केली. जागतिक दर्जाची आरे डेअरी जगात आणि भारतात गाजली. भारताच्या प्रत्येक राज्यात सहकारी क्षेत्रात दूध डेअरींची स्पर्धा लागली आणि पाच वर्षातच भारतातील दूधक्रांती आसेतु हिमाचल पोचली. दूधाचे विविध पदार्थ भारतीयांना मिळू लागले. धवलक्रांती खेड्यापाडृयातही पोचली. शेती आणि डेअरी हे जोडधंदे शेतीला उत्पादक बनवू शेतकर्‍यांना उत्पन्न वाढीचे तंत्र बनले. नैसर्गिक शेतीची उत्पादकता वाढली. 1960 साली अन्नधान्याबाबत भारत स्वयंपूर्ण बनला. सहकारी क्षेत्र, सहकारी बँकादी क्षेत्रापर्यंत विकसित झाले. पंचवार्षिक योजनांचा भाग बनले. राष्ट्रीय स्तरावरील सहकार क्षेत्र जागतिक स्तरापर्यंत पोचले. सहकार क्रांतीविना कृषकक्रांती निर्माण होऊ शकत नाही. कृषिरत्न डॉ. पंजाबरावांनी द्रष्टेपणाने ओळखूनच आपली पावले टाकलीत ! 1961 ला इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ कलकत्त्याच्या. भारत कृषक समाजाच्या अधिवेशनासाठी भारतात आल्या. तेव्हा महाराणी एलिझाबेथ यांची राहण्याची व्यवस्था कोठे करावी ही समस्या भारत सरकारपुढे निर्माण झाली. एलिझाबेथ महाराणीला निसर्गरम्य परिसरात राहण्याची सवय होती. डॉ. भाऊसाहेबांनी त्यांची राहण्याची समस्या सोडवली. मुंबई आरे डेअरीत भारतातील सर्वोत्तम न्युझिलंड होस्टेल्स निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीं युक्तींनी सजलेले होते. तेथे एलिझाबेथ महाराणी मुक्कामाला राहिल्या आणि डॉ. भाऊसाहेबांना त्यांनी धन्यवाद दिले ! सत्यम्‌शिवम्‌सुंदरम्‌हा क्रांतिमार्ग बॅ. पंजाबरावांनी जीवनभर स्वीकारला ! जय जवान, जय किसान ! 
To be or not to be चे क्षण नव्हते !
Co-operation is must ! We are not prepared to sacrifie freedom and equally in the pursuit of wealth. To us the manner of producing is as much important as the product itself. Further, there is the very material consideration that all do not participate in work and, therefore, in wealth, those who are left out will constitute a social threat which might well prove the ruin of all... to an agriculture producer,... co-operation is a necesity... 
- Dr. P. S. Deshmukhs Circular Letters, Volume No. XXVII, dated 5th Nov. 1955
डॉ. पंजाबरावांनी एकट्याच्याच पराक्रमाने दिल्ली जिंकली ! भाऊसाहेबांचा एकमेव चिरंजीव अनंतकुमार (बाळ)1946 ला सतराव्या वर्षी मुंबई विद्यापीठातून फर्स्ट क्लास फर्स्ट आला. Electricity Magnetism विषयात त्याला 75 (पंचाहत्तर) पैकी 77 (सत्त्याहत्तर) मार्क्स 77/75 मिळालेत देवास वरून भाऊसाहेबांचे उत्तर आले. Thope that examinees agree with you... डॉ. भाऊसाहेबांनाही अपूर्ण प्रबंधालाच त्यांच्या गाईडच्या सल्ल्याने D. Phil पदवी मिळाली. अंनतकुमारला रँग्लर मध्ये ट्रीपॉस पदवी प्राप्त झाली. श्रीमती विमलाबाई विदर्भातील प्रथम बी. ए. एलएल. बी. वकिलीणबाई ! अशी ही शिवकुटुंबाची गुणवत्ता !
MASS EDUCATION : I feel very angry whenever I find some leaders try to discourage education, because they say the standards have fallen... let the urban people withdraw their darling sons and daughters because the educational standards are not upto their expectations. For us any demand education is better than no education.
From Selected Speeches of Dr. P. S. Deshmukh (Page 296-97)
आपल्या जीवनात शिक्षणमहर्षि भाऊसाहेबांनी हजारो विद्यार्थ्यांना विकसित देशातील नावाजलेल्या विद्यापीठात सरकारी खर्चाने उच्च शिक्षणासाठी पाठवले. आज जगात त्यांचे वारसदार कीर्तिमान आहेत. विश्व कृषी प्रदर्शन, नवी दिल्ली (1959-60)
दिल्लीत मथुरा रोडला लागून शंभर एकर भूमीवर जगातील पहिले विश्व कृषि प्रदर्शन (World Agriculture Fair) भरले होते. केंद्रीय कृषि राज्यमंत्री डॉ. पंजाबराव देशमुखांचे हे कृषिरत्न होते ! 11 डिसेंबर 1959 ते 29 फेब्रुवारी 1960 असे एकूण 92 दिवस हे प्रदर्शन सुरू होते. 35 लाख लोकांनी प्रदर्शनाला भेटी दिल्या. उद्घाटन भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे हस्ते झाले. उपासमारीतून मुक्तता आणि जागतिक कृषी प्रदर्शनी स्मारक व कृषक कल्याण निधीची निर्मिती यातून घडली. डिसेंबर 1963 ला एक ट्रस्ट रजिस्टर करवून घेतला बॅ. पंजाबरावांनी !
पंतप्रधान नेहरु आपल्या भाषणात म्हणाले I have to address three President today. Dr. Rajandra Parasad, the Presidnet of India, the President of America D. W. Isonhower and the President of Indian Farmers forum Dr. P. S. Deshmukh. The particular occassion for this World Agriculture Fair is of vital importance to us. It represents so many things for which we stand and for which we crave. It represents the basic industry of Indian agriculture...
डॉ. आयसेन होवर यांनी प्रदर्शनाची, शिस्तीची प्रशंसा केली. आपण आपली सध्याची जबाबदारी संपली की परत शेतावर जाऊन शेती करणार. कृषक समाजाने कृषि प्रदर्शनीच्या उद्‍घाटन प्रसंगी आपणास बोलवल्याबद्दल भारत कृषक समाजाने आपला बहुमान केल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले.
भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या राष्ट्रगीतांनी समारंभास सुरुवात केली. विविध देशांचे मंडप प्रदर्शनात उभारले गेले. रशियन पॅव्हेलियन भव्य होता. रशियन प्रधानमंत्री श्री ख्रुश्चेव येऊन गेले. डॉ. राजेंद्र प्रसाद उद्‍घाटपर भाषणात म्हणाले भारतीय शेतकर्‍यांनी परंपरागत कृषिपद्घतीचा त्याग करावा नि आपल्या अन्न विषयक गरजांची पूर्तता होण्याकरता अद्यावत शास्त्रीय ज्ञान व पद्घती यांचा अवलंब करून कृषि व्यवसायाचे आधुनिकीकरण करावे. जगापासून शिकावे प्रगत व्हावे.
डॉ. भाऊसाहेबांनी जगातील कृषिसंशोधन, तंत्रशास्त्र, यांत्रिकीकरण आणि कृषिमाल गुणवत्ता भारतातील शेतकरी वर्गापर्यंत या विश्व कृषि विज्ञान निष्ठा, प्रयत्नवाद शिकवला. शेतकरी क्रांतीतूनच कृषिक्रांती आणि ग्रामक्रांती करण्यासाठी विश्वज्ञान कृषक वर्गापर्यंत आणले.

तीन संत ! तीन विद्यापीठे !

अरे तीर्थक्षेत्रात देवधर्म काही नाही. डॉ. पंजाबरावाच्या मागे जा. तोच तुमचा पांडुरंग आहे. तुम्हाला शिकवलं आणि योग्य मार्गाला लावी. त्यांच्या विद्या मंदिरात जाऊन राष्ट्रकार्याला लागा ! बुवाबाजीच्या मागे धावू नका ! पंजाबराव म्हणजे तुकोबा ! - सत्यशोधक श्री गाडगेबाबा
डॉ. पंजाबराव देशमुख कठीण परिस्थितीशी झगडलेत. मानवतेच्या विशाल दृष्टिकोणातून श्री शिवाजी शिक्षण संस्थेने विराट विश्वरूप धारण केले. दिल्लीला विश्व कृषि प्रदर्शन भरवले. दिल्लीला त्यांना भेटण्याचा सहज योग आला. कितीतरी बॅरिस्टर्स खाटेवर पडून आपल्या जीवनातील दु:खद प्रसंग सांगताना मी पाहिले-ऐकलेत ! पण या वीर व निर्भय बॅ. पंजाबरावांचे सारेच जीवन वेगळे ! मला एकदा ते म्हणाले, महाराज, आपल्या मोझरीच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाची प्रार्थना गीते मी श्री शिवाजी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना म्हणायला सांगणार आहे. मला काही भजने बरी वाटतात. ती मुलांना हितकारक प्रेरणा देणारी आहेत.’ राष्ट्रसंत ग्रामगीताकार श्री तुकडोजी
‘ज्याला तुम्ही अतिशुद्र समजता त्याला मी वेद बोलायला शिकवीन. बहुजन समाज सुशिक्षित झालाच पाहिजे. सारा भारत आणि सारे जग त्यांना समजले तरच समाजपरिवर्तन घडवेल. समाजच क्रांती करतो.’ - डॉ. पंजाबराव देशमुख

आज अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अमरावती येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अशी तीन आधुनिक संतांची तीन विद्यापीठे साकारलीत !
I do not believe in a religion or God which cannot wipe the widows tears or bring a peace of bread to orphans mouth. -स्वामी विवेकानंद
उपरोक्त व्याख्येतून डॉ. पंजाबराव Father of Orphans ठरतात. श्रद्घानंद अनाथालय, नागपूर आणि श्रद्घानंद वसतिगृह अमरावती येथील कार्यातून हाच साक्षात्कार होतो. डॉ. पंजाबरावांचे कुटुंब विशाल होते. ते विश्वकुटुंबवादी होते ! धर्मक्रांती, ज्ञानक्रांती, अर्थक्रांतिवादी होते ! 

बहुजनवादी डॉ. पंजाबराव !

डॉ. पंजाबरावांच्या विद्बत्ताप्रत्तुर, शास्त्रशुद्घ प्रबंधाकडे समाजाने डोळेझाक केली. धर्म म्हणजे अनंताविषयी तळमळ. अनंताची ओळख घडवणारी मनोवृत्ती-मॅक्समुलर. धर्म हा सामाजिक व नैतिक आहे. - हर्टलँड. धर्म हा सरळ उत्क्रांतिक्रमाचे फळ आहे. असे डॉ. भाऊसाहेबांनी मानले. पुरोहित वर्गाचे महत्त्व वाढताना मांत्रिक विद्येला अग्रमान मिळाला आणि भारताची धार्मिक व सामाजिक अवनती सुरु झाली. वैदिक धर्म म्हणजे मंत्रविद्या, पुरोहिती कसब (Priest Craft) आणि बलिदान वैदिक भारतीयांच्या अधोगतीचा पहिला टप्पा ऋग्वेदातून आढळतो. यजुर्वेदामधील अवस्था आणि अथर्ववेद व ब्राम्हण अधोगतीची परिसीमा ! मंत्रविद्येच्या सामर्थ्यापुढे ईश्वर वाकलाच पाहिजे.
अथर्ववेद. ब्राम्हणीझमची खरी सुरुवात ऋग्वेदापासून झाली. डॉ. पंजाबराव थोर संशोधक होते.
- प्रा. कु. ल. महाले

डॉ. पंजाबराव देशमुख (कदम) यांचे वडील शामराव बापू देशमुख हे एक नावाजलेले उत्कृष्ट शेतकरी होते. पंजाबरावांची पापळ म्हणूनच सर्वजण पापळला ओळखत. सर्व मुलांमध्ये पंजाबराव उठून दिसत. माझा जन्म पापळचाच (1983). मी पंजाबरावापेक्षा पंधरा वर्षांनी मोठा. पोवाड्यात पापळ म्हणजे शाहिरी नगरी!’ 
-डॉ. य. खु. देशपांडे, एम. ए. एल. एल. बी., डी. लिट., शारदाश्रम, यवतमाळ

‘डॉ. भाऊसाहेब अनुकरणीय व्यक्तिमत्व होते. मुंबईहून विवाह करून ते अमरावतीला आले तेव्हा भाऊसाहेब, त्यांच्या सुविद्य धर्मपत्नी विमलाबाई आणि मी एकाच डब्यातून अमरावतीला उतरलो. नवीन थाटलेल्या संसारासाठी एका बगलेत प्रायमरचा स्टोव्ह आणि हाती काही घरगुती लागणारे सामान येऊन बाजारातून येताना मी त्यांना पाहिले आहे. देशहितकारी त्यांच्या अफाट कार्याकडे मी जीवनभर पाहत होतो.’ 
- बाबासाहेब खापर्डे, राजकमल चौक, अमरावती 

डॉ. भाऊसाहेबांचे राजकारण ! 

नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, पोलादी गृहमंत्री आणि महान संघटक, सातार्‍याचे स्वातंत्र्य संग्राम सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील ज्यांनी सातार्‍यात एकमेव स्वत:चे सरकार (प्रती सरकार) स्थापन केले... विरोधकांनी पत्री सरकार म्हणून क्रांतिसिंहाचे अवमूल्यन केले. सरदार पटेल आणि डॉ. पंजाबरावांनी उपेंद्र मंडळाद्बारे भारतातील सर्व संस्थानिकांनी भारतीय लोकशाहीत विलीन होण्याबाबत महाप्रयत्न केले. हैद्राबाद संस्थानातील रझाकारांची दहशती समस्या पोलादी गृहमंत्र्यांनी कठोरपणे सोडवली ! मेजर जनरल जगन्नाथराव भोसले (आझाद हिंद सेना) यांची केस लाल किल्ल्यात बॅ. पंजाबरावांनीच चालवली. नेहरू मंत्रीमंडळातील कॅप्टन शहानवाझ खान रेल्वे मंत्री भाऊसाहेबांचे मित्र होते. नेताजींशी तर पंजाबरावांचे लंडनमध्ये दैनंदिन चर्चासत्र सुरू राही ! या डॉ. पंजाबरावाच्या राजकीय संबंधामुळे राजकारणात त्यांना योग्य स्थान मिळाले नाही. असामान्य कर्तृत्वाचे आणि पंतप्रधानाच्या योग्यतेचे व्यक्तिमत्व यामुळेही गांधीजींनंतर डॉ. पंजाबरावांकडे भयभीत नजरेने राजकारणी बघत होते ! राजकारण भाऊसाहेबांचे साधन होते. साध्य नव् हते. समाजकारण, कृषककारण, शिक्षणकारण ही त्यांची साध्ये होती. राजकारणाला साध्य मानणार्‍यांनी त्यांना दूर लोटले ! डॉ. पंजाबराव अजरामर झाले !
Dr. Deshmukh has a distinguished service to his lasting credit as an administrator and educationist and above all as an unbending patriot. - K. Kamaraj (1964)
Dr. P. S. Deshmukhs splendid record of work in the field of education, agriculture and co-operation is India treasure. Dr. Deshmukh has great qualities of leadership and he displayas them with vision, energy and enthusiasm.
- Dr. C. D. Deshumukh(1964)

भारतरत्न म्हणून गौरवावे !

डॉ. पंजाबराव देशमुखांना एकविसाव्या शतकात तरी भारतरत्न (मरणोपरांत) देऊन गौरवावे. भारतीय शेतकरी वर्गाची ही मागणी आहे. शेतकरी वर्गाच्या समृद्घीचे राष्ट्रीय धोरण राबवणे यातच लोकशाही भारताचे संवर्धन होईल. भारतीय संविधानाला समाजवादी दिशा देण्यात बॅ. पंजाबरावांचे भरीव योगदान आहे. भारतरत्न पदवीला धार्मिक, सांस्कृतिक केंद्रीकरणाकडून समाजवादी प्रजासत्ताक विकेंद्रीकरणाकडे आणावे ! 107 कोटींचा भारत आणि 60 कोटी मतदार 75 कोटी शेतकर्‍यांसह या भारतरत्न क्रांतीची वाट पाहत आहेत ! कृषिरत्नाकडून भारतरत्नाकडे डॉ. पंजाबरावांना नेऊन क्रांतिन्याय द्यावा ! या शांततापूर्ण मागणीकडे शेतकरी भारताच्या सरकारने प्रेमपूर्वक लक्ष द्यावे सत्यमेव जयते !
_________________________________________________
प्रा. सुधाकर मोहोड, से. नि. प्राध्यापक, धनवटे नॅशनल कॉलेज, नागपुर तथा संस्था आजीवन सदस्य

(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) 

No comments:

आदरांजली :

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्व जगाला परिचित आहेत.‘बहुजन हिताय’हा त्यांच्या जीवन-कार्याचा मूलमंत्र होता.‘वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास’ ह्या ग्रंथातील भाऊसाहेबांचे संशोधन भारतीय दैवतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.भाऊसाहेबांच्या चरणी ही नम्र आदरांजली...
लोकमत : अकोला : दि.२६ एप्रिल २००९

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :
"Art is long and life is short,Remember this and drive your cart." - Dr.Punjabrao Deshmukh

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा