शिक्षण महर्षी,कृषिरत्न


डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

डॉ.पंजाबराव देशमुखांवर साकारतोय चित्रपट


******************************************************
डॉ.पंजाबराव देशमुखांवर साकारतोय चित्रपट
सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त नांदगावात, तंत्रज्ञ मुंबईतील, कलावंत मात्र वर्‍हाडातील
******************************************************
******************************************************



शिक्षण महर्षी डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे चित्रिकरण अमरावती जिल्ह्यातील नांदगाव (खंडेश्‍वर) तालुक्यात सुरू झाले आहे. या चित्रपटाची निर्मिती श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा करण्यात येत असून चित्रिकरणासाठी प्रख्यात दिग्दर्शक राजदत्त नांदगावात तळ ठोकून आहेत.
भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवन कार्यावर तयार होणारा हा चित्रपट दीड ते दोन तासांचा राहणार आहे. त्याचे चित्रिकरण तीन महिन्यांत पूर्ण होऊन अवघ्या सहा महिन्यांत प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाची कथा श्रीकृष्ण राऊत यांनी रेखाटली असून संगीत दिग्दर्शक, संगीतकार आनंद मोडक हे आहेत. या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शक गिरीश कुळकर्णी, भक्ती मायाळू, तुकाराम बिरकड, स्वप्नील बोरकर हे आहेत. ध्वनी रेखन प्रमोद पुरंदरे, कला दिग्दर्शक राजाभाऊ मोरे, मेकअप मॅन दिनेश नाईक हे आहेत. या चित्रपटात डॉ. पंजाबरावांच्या भूमिकेत पद्माकर सरप, विमलाबाई (पत्नी)च्या भूमिकेत मीरा पाध्ये व शिवराय कुळकर्णी शामराव बापू (वडील)च्या भूमिकेत आणि स्मिता देशमुख या राधाबाई (आई)च्या भूमिकेत झळकणार आहेत. यात इतरही १२५ ते १५0 कलावंतांचा समावेश राहणार आहे. त्यात अनेक स्थानिक कलावंतांना संधी प्राप्त झाली आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण नांदगाव (खंडेश्‍वर) तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती, शेलू नटवा येथील हरिभाऊ भोयर यांचे घर व धामक येथील प्रेमचंद लुणावत यांच्या वाड्यात सुरू आहे. या चित्रिकरणात खेडे गावातील भाऊसाहेब पंजाबराव यांच्या परिवारातील अनेक छोटे-मोठे प्रसंग व त्यांचे शैक्षणिक कार्याबद्दलची नाड कशी जुळली हे प्रत्यक्षात साकारण्याचा प्रयत्न केला जात आहे. या चित्रपट निर्मितीसाठी सकाळी ८ वाजतापासून सायंकाळी ९ वाजेपर्यंत सर्वचमू चित्रिकरणाच्या सेटवर राबत आहे. भाऊसाहेब डॉ. पंजाबराव नावाची ओळख आजही बाहेर फार नाही. गडगंज इस्टेट नसतानाही शिक्षणाचे जाळे विदर्भात उभे केले. शेतकर्‍यांची, कष्टकर्‍यांची मुले शिकावीत, त्यांचे पैशावाचून शिक्षण अडू नये म्हणून सर्व सामान्यांसाठी शिक्षण संस्था उभी केली. भाऊसाहेबांना त्यांच्या वडिलांचीही प्रेरणा होती. भाऊसाहेब पंजाबरावांनी केलेले महान कार्य आजच्या पिढीला सांगण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती आहे, असे दिग्दर्शक राजदत्त यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

No comments:

आदरांजली :

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्व जगाला परिचित आहेत.‘बहुजन हिताय’हा त्यांच्या जीवन-कार्याचा मूलमंत्र होता.‘वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास’ ह्या ग्रंथातील भाऊसाहेबांचे संशोधन भारतीय दैवतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.भाऊसाहेबांच्या चरणी ही नम्र आदरांजली...




लोकमत : अकोला : दि.२६ एप्रिल २००९

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :
"Art is long and life is short,Remember this and drive your cart." - Dr.Punjabrao Deshmukh

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा