अंधार चहुकडे गिचमिटला
काळोख कोंदला बुजबुजला ॥
‘फुले’ चमकले तेजबळानें
‘विष्णूशास्त्री’ नव तेजानें
‘भाउराव’ ते दृष्टि बलानें
‘कर्व्यांनि’ उजेडा वाव दिला !
‘पंजाबाची’परी अघाडी-
ठरली, तोडी गुलामबेडी
पुर्ण करि तया हा खेळगडी
त्यांतून किरण नव पाजळला !
आली दयिता मदत कराया
खपे-जिवलगा, अवीट राया
अलंकारले वृक्ष नि छाया
तेजोमय मंडप डवडवला !
तुवां लाविली बीजें नव नव
स्वांतत्र्याचे टिकविल वैभव
आधाराचे तुझे सदा रव
खळोत किरण हे खळाखळां !
तुवां पाहिले अतुल्य केवल -
वेदांताचे तेज, मनोबल
छत्रपतींची छाया दाविल
विमुक्ति दे विद्या सकलां !
-गिरीश
No comments:
Post a Comment