अभिवादन


ज्ञानियाने उभारिले सरस्वतीचे मंदिर
बहुजनासाठी तुच पुन्हा उघडिले व्दार

ब्रह्मविद्येचा पिंपळ दारोदार फुलविला
वेद मुक्या ओठातून अमृताचा बोलविला

देह झिजता चंदनी बुका, व-हाडी मातीचा
कणसातल्या मोत्यात गंध दर्वळे तयाचा

दशदिशा उजळीत ज्ञानदीप मालवला
अश्रु पुर्णाचे पोरक्या गंगा यमुनेच्या डोळा ...!

- विठ्ठल वाघ

No comments:

Post a Comment